‘HND बोर्डिंग’ प्रकरणात नवी दिशा; राजू शेट्टींची ‘जैन बोर्डिंग ट्रस्ट’चे नाव पुनर्स्थापनाची मागणी

कोल्हापूर | जैनवार्ता

भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी ‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ असे भगवान महावीरांच्या शिकवणीवर आधारित ट्विट केल्यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, “धर्मादाय आयुक्तांनी HND बोर्डिंगचा व्यवहार दोन्ही बाजूंनी रद्द केल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ज्या वेगाने ट्रस्टची खरेदी होऊन ‘गोखले बिल्डर’चे नाव लावण्यात आले, त्याच वेगाने पुढील दोन दिवसांत ते नाव काढून पुन्हा ‘जैन बोर्डिंग ट्रस्ट’चे नाव लावण्यात यावे. तेव्हाच आपण भगवान महावीरांसमोर दिलेला शब्द खर्‍या अर्थाने पूर्ण कराल.”

धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामुळे ‘HND बोर्डिंग’ वादावर काहीअंशी पडदा पडल्याचे दिसते. तथापि, राजू शेट्टींच्या या थेट प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला राजकीय तसेच सामाजिक स्तरावर नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *