( History ) दख्खनच्या इतिहासाचे सूक्ष्म दर्शन घ्यायचे असेल तर यादवकालीन नाण्यांचा अभ्यास अत्यावश्यक ठरतो, असे प्रतिपादन करणारे ख्यातनाम नाणाशास्त्रज्ञ डॉ. शैलेन भांडारे यांचे विशेष व्याख्यान बुधवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे.
( History ) इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दुपारी ३ ते ५ दरम्यान होणाऱ्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी केले.
( History ) ‘यादवकालीन दख्खन – नाणकशास्त्रीय सर्वेक्षण’ या विषयावर आधारित हे व्याख्यान असून, विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्र (मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रे) व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ब्रह्मानंद देशपांडे स्मृती व्याख्यानमाले’चा हा महत्त्वाचा भाग आहे.
डॉ. भांडारे हे सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील ॲशमोलियन संग्रहालयात वरिष्ठ वस्तुपाल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय नाणकशास्त्र व दख्खनच्या इतिहासातील त्यांच्या संशोधनाचा शैक्षणिक वाङ्मयात महत्त्वपूर्ण ठसा असून, या व्याख्यानामुळे अभ्यासकांना नव्या दृष्टिकोनाची जोड मिळेल, अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.