जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना व आत्मसाधना सेमिनार

अहिल्यानगर | प्रतिनिधी

महावीर मेरा पंथ आणि Jainmantras.com तर्फे दोन दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आत्म साधक श्री सुरेंद्रकुमार राखेचा (सूरत)होणाऱ्या या सेमिनारचा उद्देश भक्तीद्वारे भौतिक आणि आत्मसमृद्धी साधणे हा आहे.

हा सेमिनार “जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना आणि आत्म साधना” या विषयावर आधारित असून, यात सहभागी होणाऱ्यांना अध्यात्मिक साधनेसह जीवनात संतुलन आणि आनंद प्राप्त करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

20 सप्टेंबर 2025, शनिवार सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत

21 सप्टेंबर 2025, रविवार सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत

सेमिनारचे ठिकाण आनंद धाम (धार्मिक परीक्षा बोर्ड), अहिल्यानगर येथे निश्चित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ज्या जैन साधकांच्या घरी कोणतेही जैन यंत्र किंवा फ्रेम असेल त्यांनी ते सोबत आणावे, जेणेकरून त्याबाबत संपूर्ण माहिती या सेमिनारमध्ये मिळू शकेल. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *