अहिल्यानगर प्रतिनिधी
समाजकार्यातील उल्लेखनीय कार्य, अखंड जनसेवा आणि संघटनात्मक नेतृत्वाची भक्कम पायाभरणी यांची दखल घेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गौरवामुळे फिरोदिया यांच्या कार्याचा व्यापक सन्मान झाला असून, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची ठळक नोंद समाजजीवनात झाली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीला दिशा देणारा ठरत असल्याचे मत या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. छायाताई फिरोदिया यांचा हा सन्मान समाजातील महिलांच्या नेतृत्वक्षमतेची दखल घेणारा ठरल्याचे सर्वत्र गौरवोद्गार काढले जात आहेत. या सन्मानामुळे समाजकार्य क्षेत्रात नवे प्रेरणास्त्रोत निर्माण झाले आहेत.



