अहिल्यानगर | प्रतिनिधी
अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्यांचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचा शुभारंभ २० नोव्हेंबर रोजी होणार असून समारोप १९ डिसेंबर रोजी होईल. हे प्रशिक्षण शासकीय आयटीआय, एमसीईडी कार्यालय परिसर, जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी सय्यद दिलावर, विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास आणि एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये उद्योग उभारणी, व्यवस्थापन कौशल्य, बाजारपेठेचे आकलन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल लेखन, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय नियोजन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष उद्योग भेटींचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी उमेदवार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे आहे. प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा गुणपत्रिका आणि पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांसह इच्छुक उमेदवारांनी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत शनिराज प्रिंटिंग क्लस्टर, तपोवन रोड, अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे.
त्याच दिवशी मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार असून अधिक माहितीसाठी तेजस वैद्य – 7378893673 या क्रमांकावर संपर्क साधावा.