दिव्यांग व मूकबधिर बांधवांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा; १० हून अधिक जोडप्यांनी जागीच निवडला जीवनसाथी प्रहार करिअर अकॅडमीच्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रभरातून दोन हजारांहून अधिक युवक-युवतींची उपस्थिती
अहिल्यानगर | प्रतिनिधी सर्वधर्मीय दिव्यांग व मूकबधिर बांधवांसाठी प्रहार करिअर अकॅडमी, अहिल्यानगरच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पवार तसेच संचालक व माजी सैनिक विनोदसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध आदर्श सरपंच…
