अहिल्यानगर | प्रतिनिधी
राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी महाराज साब यांच्या पावन उर्जेने ओतप्रोत असलेल्या आनंदधाम येथे 13 मे रोजी श्रीमती विजयाजी प्रकाशचंदजी कोचर (वय 67) यांनी संसार मोहाचा त्याग करून जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. ‘करेमि भंते’च्या पाठाद्वारे त्यांनी संयमी जीवनात प्रवेश केला असून आता त्यांचे साध्वी जीवन पू श्री विदिताजी म सा या नावाने सुरू झाले आहे.
जैन धर्मातील दीक्षा परंपरेनुसार छोट्या दीक्षेनंतर नवदीक्षित साधू-साध्वींच्या संयमी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पंचमहाव्रतांची परिपक्वता जाणून त्यांचे आरोपण मोठ्या दीक्षा विधीत केले जाते. त्यानुसार नवदीक्षिता पू श्री विदिताजी म सा यांची मोठी दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रवर्तक प पू श्री कुंदनऋषिजी महाराज साब, प्रबुद्ध विचारक पू श्री आदर्शऋषिजी महाराज साब, संस्कार दिवाकर पू श्री आलोकऋषिजी महाराज साब आदी साधू-साध्वीजी महाराजांच्या सानिध्यात तसेच उपप्रवर्तिनी पू कंचनकंवरजी महाराज यांच्या नेश्रायमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
हा मोठा दीक्षा सोहळा मंगळवार, 19 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता आनंदधाम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व श्रद्धाळू श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



