पाथर्डी (कासार पिंपळगाव)| प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल ९५.२९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीतील पहिल्या पाचही क्रमांकांवर विद्यार्थिनींनी बाजी मारली.
या परीक्षेत राजळे अनुश्री साईनाथ हिने ९३ टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
पवळे मयुरी रामेश्वर हिने ९१.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. लवांडे मनस्वी मिलिंद हिने ९०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. दळवी अंजली गजानन हिने ९०.४० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळवला, तर दळे वैष्णवी महादेव हिने ८९.६० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयातून एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. विद्यालयाचा एकूण निकाल ९५.२९ टक्के लागला.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा.श्री रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष डॉ. विवेकजी भापकर साहेब, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश दादा मुळे साहेब, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, ज्येष्ठ विश्वस्त नंदकुमार झावरे साहेब, सिताराम खिलारी साहेब तसेच सर्व विश्वस्त व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



