शिवरायांच्या इतिहासाला रंगांची उधळण; विभागीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर | नितीनचंद्र भालेराव

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हिवरगाव पावसा येथील कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्या वतीने आयोजित विभागीय स्तरीय चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगमनेर, अकोले, राहुरी आणि नगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर रंगांची उधळण करत ही स्पर्धा गाजवली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. चिमुरड्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून समाजसुधारक, ऐतिहासिक प्रसंग, पर्यावरण संवर्धन, लेक वाचवा अभियान आणि निसर्गचित्रे अशा विविध विषयांवर उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि आकर्षक रंगसंगती पाहून उपस्थित शिक्षक व पालकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलच्या प्राचार्य मनीषा राहणे, चंदनेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर, देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले, आर. पी. रहाणे, संजय दारोळे आणि मुख्याध्यापिका सातपुते यांच्यासह विविध कला शिक्षकांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *