Politics | सरकारच्या अल्पमदतीवर शेतकऱ्यांचा रोष; सामनगावात भाकपचा रास्तारोको”

शेवगाव | जैनवार्ता (Politics) अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामनगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”, “प्रतिहेक्टर सत्तर हजार मदत द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Politics) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार…

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्याचा मान

अहिल्यानगर | (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन 2 बी च्या राज्यस्तरीय अधिवेशनात जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला सामाजिक कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्याचे प्रथम पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले. तसेच, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांना सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी ही…

नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे – संध्याताई गायकवाड; अहमदनगर एज्युकेशन सोसायटी गुणवंतांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)  “इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण विद्यार्थी शिक्षकाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ…

पांगरमल गावात नुकसानीचे पंचनामे सुरू; भीमराज आव्हाड यांचे उपोषण स्थगित

नगर | प्रतिनिधी नगर तालुक्यातील पांगरमल गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. ग्रामसेविका वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींवरून पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत शेतकऱ्यांसह उपोषणास सुरुवात केली. यावेळी पांडुरंग आव्हाड,…

‘जागेवर निवड संधी’ उपक्रम; तरुणांना मिळणार रोजगार १ ऑक्टोबर

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम बुधवार, ता. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे. सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी दिलेल्या…