अहिल्यानगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदकांची लयलूट केली. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध शाळांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य सादर करत जिल्ह्यात वर्चस्व गाजवले असून, अनेक खेळाडू पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
खो-खो (मुली, 14 वर्षे वयोगट)
संघाने तृतीय क्रमांक पटकावला. कु. मानसी वाबळे हिची पुणे विभागीय निवड चाचणीसाठी निवड झाली.
कबड्डी (मुले, 17 वर्षे वयोगट)
संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
उत्कृष्ट खेळाडू – कार्तिक गुंड, सुमित सावंत, संस्कार सप्रे, मनीष देव्हारे.
मल्लखांब (रोप, मुली 14 वर्षे)तेजस्विनी शेळके हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
जलतरणात फिरोदियांचा जलवा
(मुली, 14 वर्षे वयोगट)
त्रिवेणी पंडित: 200, 100 आणि 50 मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम क्रमांक; विभागीय निवड.स्वरा खिल्लारी: 100 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर बॅक व 50 मीटर बटरफ्लाय – द्वितीय क्रमांक; विभागीय निवड.
(मुले, 14 वर्षे वयोगट)स्वराज लोटके: 50 मीटर बॅकस्ट्रोक – प्रथम क्रमांक.ओंकार शिंदे: 50 मीटर बॅक – द्वितीय क्रमांक.वेदांत कराड: 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – प्रथम क्रमांक; 100 मीटर फ्रीस्टाईल व 50 मीटर ब्रेस्ट – द्वितीय क्रमांक; सर्व स्पर्धांमध्ये विभागीय निवड.
(मुली, 17 वर्षे वयोगट)
चैत्राली धर्माधिकारी: 400 मीटर फ्रीस्टाईल व 100 मीटर बॅकस्ट्रोक – प्रथम क्रमांक; 50 मीटर बॅक – द्वितीय क्रमांक; विभागीय निवड.
मैदानी स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी
ॲथलेटिक्स:
हर्षद गुंड: गोळाफेक – प्रथम क्रमांक.ओम पवार: 400 व 600 मीटर धावणे आणि 80 मीटर अडथळा शर्यत – सर्व प्रथम क्रमांक.गायत्री शिर्के: 400 व 600 मीटर धावणे – प्रथम क्रमांक.
हर्षदीप पवार: 100 व 200 मीटर धावणे – द्वितीय क्रमांक.
पलक जगदाळे: 100 मीटर धावणे – तृतीय क्रमांक.
सई निमसे: 400 मीटर धावणे – तृतीय क्रमांक.
रोलर स्केटिंग:
संस्कार कुलकर्णी: 17 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी पात्र.
संस्थेचा गौरव व अभिनंदनाचा वर्षाव विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, तसेच शिक्षक कल्पना पाठक, वैभव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक कैलास करपे, गणेश मोरे, योगेश वागस्कर, किरण हंगेकर आणि विकास साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.