केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य फ्लडलाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल अकरा दिवस रंगलेल्या या स्पर्धेत शहर तसेच तालुक्यातील अनेक संघांनी दमदार कामगिरीची नोंद केली.
अंतिम फेरीत स्टेशन स्टार्स संघाने उल्लेखनीय खेळ करत विजेतेपद पटकावले, तर एकनाथ नगर संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. वांबोरी संघ तृतीय क्रमांकावर राहिला. विजेत्या संघांना अनुक्रमे ₹३१ हजार, ₹२१ हजार व ₹११ हजार अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. विविध प्रायोजकांच्या सहकार्याने एकूण ₹५१ हजार रुपयांची पारितोषिके खेळाडूंमध्ये वितरित झाली.
बक्षीस वितरणप्रसंगी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर म्हणाले, “स्पर्धा म्हणजे फक्त जिंकणे-हरणे नव्हे, तर आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी आहे.” सागर सातपुते यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश सातपुते, सागर सातपुते, संतोष कोतकर, मयूर जगदाळे, संतोष बोरा यांच्यासह केडगाव ग्रामस्थांनी मनापासून परिश्रम घेतले. समालोचनाची जबाबदारी विश्वेश्वर प्रतिष्ठान व संदीप दादा कोतकर युवा मंच सदस्यांनी सांभाळली.