अहिल्यानगर | (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन 2 बी च्या राज्यस्तरीय अधिवेशनात जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला सामाजिक कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्याचे प्रथम पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले. तसेच, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांना सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी ही माहिती दिली.
या अधिवेशनात जायंट्स इंटरनॅशनलचे विश्व उपाध्यक्ष विजय चौधरी आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जीवन राजपूत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, जगन्नाथ साळुंके, डॉ. गुरूदत्त राजपूत, संतोषी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या ४० वर्षांपासून शहरात कार्यरत असलेला जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. वंचित घटकांना सहाय्य, आरोग्य शिबिरे, आणि शैक्षणिक उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेची नवी उंची गाठली आहे.
राज्यस्तरीय अधिवेशनात ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अनिल गांधी, अभय मुथा, अमित धोका, पूजा पातूरकर, विद्या तन्वर, नूतन गुगळे, आशा कवाने आदी सदस्य उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर व संजय गुगळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



