जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; रुग्णांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय

अहमदनगर | प्रतिनिधी

जागतिक अंध दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सविस्तर नेत्र तपासणी केली जाईल. तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्यांच्यावर पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांच्या निवास आणि जेवणाची संपूर्ण मोफत व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.

  • गरजू आणि इच्छुक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच नावे नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे (मो. 9881810333) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *