मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबरला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अहिल्यानगर | जैनवार्ता

नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत या ठिकाणी दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी घेतली जाणार आहे.

मतदानाची पूर्वतयारी म्हणून अधिकारी व कर्मचारी दि. १ डिसेंबर रोजीच नियुक्त मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा पूर्णपणे उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दि. १ डिसेंबर व दि. २ डिसेंबर २०२५ रोजी या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ही सुट्टी अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *