अहिल्यानगर | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत अहिल्यानगर येथील यंग मेन्स जुडो हॉलची खेळाडू ऋचा राकेश बोगा हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र संघासाठी कास्यपदक पटकावले. या यशामुळे अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव वाढला आहे.
ऋचाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ही २७ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत १४ वर्षांखालील ४४ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवल्यामुळे झाली होती. यापूर्वीही तिने ज्युडो व कुराश या खेळप्रकारांत सातत्यपूर्ण यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
सध्या ऋचा अहिल्यानगर येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तिला यंग मेन्स जुडो हॉलचे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर तसेच आदित्य धोपावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, धनंजय जाधव, न्यू कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे, मुख्याध्यापक दुगड, प्रा. कैलास साबळे, प्रा. करपे, रमेश बोगा, श्रीकांत छिंदम, राजेंद्र बोगा, सुशांत जाधव, ज्ञानेश्वर गालपेल्ली, अमर येमूल, निर्मला बोगा, पल्लवी बोगा तसेच नातेवाईक व क्रीडाप्रेमींनी ऋचाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



