सिद्धीबाग ज्युडो हॉल येथे अहिल्यानगर शहर शालेय कुराश–कुस्ती स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाम नळकांडे, सचिन शिंदे, संदीप दातरंगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुलं व मुलींच्या एकूण ४६ वजनगटात सामने पार पडले. सिद्धीबाग ज्युडो हॉलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मोठ्या प्रमाणावर सुवर्णपदकांची कमाई केली.
राज आव्हाड (45 किलो), युवराज सोनवणे (50 किलो), राम होळकर (55 किलो), वीर साळवे (60 किलो), यश शिनगारे (66 किलो)
सर्व विजयी खेळाडूंची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड घोषित झाली असून त्यांच्या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय कीर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, मुख्य प्रशिक्षक आदित्य धोपावकर, शुभम दातरंगे आणि अथर्व नरसाळे यांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना मोठा लाभ झाला.
अहिल्यानगर कुराश संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव व अहिल्यानगर यंग मेन्स ज्युडो संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी खेळाडूंना सतत प्रोत्साहन दिले.
स्पर्धेला पालक, प्रशिक्षक आणि पदाधिकारी यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी हे खेळाडू सज्ज झाले आहेत.