अहिल्यानगरच्या रणरागिणींचा राज्यस्तरीय कबड्डीतील डंका! आनंद विद्यालयाच्या किशोरी गटाचे उपविजेतेपदाने नगरचा गौरव
अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगरच्या रणरागिणींनी आपल्या जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर राज्यस्तरीय किशोरी गटाच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत नगर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर तसेच आनंद विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसन तरटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अष्टेकर आणि…
