भाकप, किसान सभेचे राज्यभर रास्ता रोको आंदोलन; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार मदतीची मागणी
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा सचिवांची बैठक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी होते. मागील दोन महिन्यांपासून विशेषतः…
