फ्लडलाईटखाली प्लास्टिक बॉल क्रिकेटचा जल्लोष; स्टेशन स्टार्सचा विजय, एकनाथ नगर उपविजेता
अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य फ्लडलाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल अकरा दिवस रंगलेल्या या स्पर्धेत शहर तसेच तालुक्यातील अनेक संघांनी दमदार कामगिरीची नोंद केली. अंतिम फेरीत स्टेशन स्टार्स संघाने उल्लेखनीय खेळ करत विजेतेपद पटकावले, तर एकनाथ नगर संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. वांबोरी संघ तृतीय क्रमांकावर राहिला. विजेत्या…
