वेतनकपात व सुट्ट्यांचे थकित प्रकरण तापले; मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचा राज्यभर कामबंदचा इशारा

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पेमेंट वाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची थकबाकी तत्काळ देण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. श्रीरंग गिते तसेच सोपान शिंदे, रवी…