वादांचा दिलासा देणारा मार्ग : राष्ट्रीय लोक अदालतीत 9 प्रकरणांचा सामोपचाराने निकाल, 58.67 लाखांची तडजोड

अहिल्यानगर | प्रतिनिधी वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाचविण्यासाठी लोक अदालत ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे मत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी व्यक्त केले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्या बोलत होत्या. न्यायाधीश भालेराव म्हणाल्या, “न्यायालयीन खटले अनेकदा दीर्घकाळ चालत असल्याने दोन्ही पक्षांना आर्थिक…