जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम बुधवार, ता. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे.
सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करून कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या उपक्रमात दृष्टीदा आयुर्वेदिक आय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, क्लासिक व्हिल्स लि., एमआयडीसी व महालक्ष्मी ॲटोमोबाईल्स प्रा. लि. या खाजगी आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. आयटीआय, डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जागेवरच नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नोंदणीसाठी उमेदवारांनी सेवायोजन संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in
तसेच राष्ट्रीय करिअर सेवा संकेतस्थळ www.ncs.gov.in
वर मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी समन्वयक वसीमखान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.