“Ahilyanagar Open Chess Tournament – विजेत्याला 1 Lakh Prize!”

अहिल्यानगर | जैनवार्ता

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला एक लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू यांसह विविध राज्यांतील २०० हून अधिक बुद्धिबळपटू सहभागी होत असून, इंटरनॅशनल मास्टर आदित्य डिंगरा, राहुल संगमा आणि अनुप देशमुख यांसारखे नामवंत खेळाडूही उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत साडेपाच वर्षांचा सर्वात लहान खेळाडू आणि ८३ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू सहभागी होत असून, बुद्धिबळप्रेमींसाठी ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. एकूण ९ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल.

समारोप व बक्षीस वितरण समारंभ रविवारी (९ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला असून, पंच विनिता श्रोत्री, श्रद्धा विंचवेकर, शार्दुल तापसे, पवन राठी यांच्यासह आठ सहाय्यक पंचांच्या देखरेखीखाली स्पर्धा पार पडेल.

अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सचिव यशवंत बापट, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी आणि सुबोध ठोंबरे आदी सदस्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.

इच्छुकांनी नावनोंदणीसाठी संपर्क साधावा –

📞 यशवंत बापट (९३२६०९२५०१)

📞 पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *