स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाऊंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अहमदनगर किल्ल्यातील ‘नेता कक्ष’ येथे पार पडणार आहे.
मौलाना अबुल कलाम आजाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अहमदनगर किल्ल्यात साडेतीन वर्षे मौलाना आजाद कैदेत होते, आणि याच त्यांच्या वास्तव्याच्या खोलीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मौलाना आजाद यांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या देशसेवेच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित या सोहळ्याला सर्व समाजबंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले आहे.