आरएसएसकडून आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

अहिल्यानगर | जैनवार्ता

आद्य क्रांतिकारक व क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अहिल्यानगरमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. संघाचे जिल्हा कार्यवाहक हिराकांत रामदासी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीस व कार्यास आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रतिपादित केलेल्या शरीर सौष्ठवाच्या महत्त्वावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. समाजात शारीरिक स्वास्थ्याबाबत जागृती निर्माण व्हावी आणि त्यांच्या प्रेरणेने तरुणांनी सक्षम आणि सुदृढ शरीरसंपदा घडवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अभिवादन कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह अप्पा लोहार, समरसता गतीविधी जिल्हा संयोजक चंद्रकांत खजिनदार, शहर संयोजक चंद्रकांत काळोखे, समरसता जिल्हा मंडळाचे राहुल जाधव, सुरेंद्र बोराडे, रामभाऊ वडागळे, अरुण दहिफळे, शेखर खांदाट, सागर खरे, अजिंक्य कोळपकर, महावीर गांधी तसेच लालटाकी–सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *