कासार पिंपळगावात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी; बालदिनानिमित्त विविध उपक्रम

अहिल्यानगर | पाथर्डी जैनवार्ता

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कासार पिंपळगाव येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती उत्सव आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड श्री. विजय भताने सरांनी केली. यावेळी श्री. लवांडे शिवाजी यांनी आपल्या मनोगतामधून नेहरूंच्या जीवनावर प्रकाश टाकत “मुले-मुलीच उद्याचे भविष्य आहेत,” या भावनेतून सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी शिक्षण व बालकल्याणाबाबत नेहरूजींचे विचारही मांडले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पांडुरंग गोसावी सर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सांगता केली. अध्यक्षीय भाषणात श्री. गोसावी सरांनी नेहरूंचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडत, चांगल्या विचारातून चांगली संस्कारक्षम पिढी घडवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी सहभाग नोंदवला. यामध्ये शिक्षक राजेंद्र वांढेंकर, सचिन पवार, किशोर बनकर, विष्णू सरोदे, संजय गायकवाड, भाऊसाहेब औसेकर, संजय आठरे तसेच गोबरे मॅडम, दुशिंग मॅडम, शेख मॅडम, भांगरे मॅडम यांचा समावेश होता. विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *