शालेय कुराश स्पर्धेत बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा दबदबा; मुली व मुलांचा संघ विजेता

अहिल्यानगर | जैनवार्ता

अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शाळेच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींचा तसेच 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने शहरात प्रथम क्रमांक पटकावत प्रभावी कामगिरी साकारली.

मुलींच्या विभागात 9 तर मुलांच्या विभागात 10 खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या प्रभावी खेळाच्या जोरावर स्पर्धेत शाळेचा ठसा उमटला. येत्या 25 नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर वाडियापार्क क्रीडा संकुल येथे होणाऱ्या पुणे विभागीय कुराश स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची निवड झाली आहे.

14 वर्षे वयोगटातील निवड खेळाडू :

मुली : धनश्री दहिवळ, सिमरन शेख, श्रावणी साळुंके

मुले : ओम लकडे, युवराज आव्हाड, ओम दहिफळे, सार्थक तनपुरे, यश जाधव

17 वर्षे वयोगटातील निवड खेळाडू :

मुली : आरुषी लांडगे, आरोही खवळे, प्रिया खाकाळ, यशश्री पोळ

मुले : आयुष बागडे, वीर घोडे

19 वर्षे वयोगटातील निवड खेळाडू :

मुली : दिव्या मेठे, नक्षत्रा कुंटला

मुले : वीर साळवे, विराज खरपुडे

या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षिका अंजली देवकर व अमोल धानापूर्ण यांनी मार्गदर्शन केले.

शालेय खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, शाळा समितीचे चेअरमन भूषण भंडारी, समिती सदस्य ॲड. गौरव मिरीकर, मुख्याध्यापक अजय बारगळ, उपमुख्याध्यापक आर.एन. भांड व पर्यवेक्षक व्ही.बी. गिरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *