अहिल्यानगर | प्रतिनिधी
( Helth )केडगाव येथील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’ (Rural Dental Health Awareness) पथकाच्या वतीने मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
( Helth )या शिबिरात तज्ज्ञ दंतवैद्य डॉ. ओमकार भालसिंग, डॉ. शिल्पा, डॉ. प्रियंका झावरे, डॉ. प्रिया भालसिंग आणि डॉ. हर्षा गांधी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या दातांची सखोल तपासणी केली. संस्थेच्या कमिटी मेंबर मेघा बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
( Helth )तज्ज्ञ मार्गदर्शन करताना डॉ. ओमकार भालसिंग व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना दातांची योग्य निगा कशी राखावी, दात किडण्याची प्रमुख कारणे त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. पथकातील डॉक्टरांनी प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक तपासणी करून आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
( Helth )मेघा बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दैनंदिन स्वच्छतेचे नियम पाळण्याचा संकल्प केला. ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’ टीमच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



