कान्स | २३.२ | प्रतिनिधी
Cannes World Film Festival च्या जानेवारी २०२६ साठी जाहीर झालेल्या नामांकनांमध्ये भारताने उल्लेखनीय ठसा उमटवला आहे. Best Documentary Short या विभागात भारतीय दिग्दर्शक Suryoday Singh Mann यांच्या My Sweet Paro- Remembering a Matriarch या माहितीपटाला नामांकन मिळाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
जगभरातील विविध देशांतील चित्रपट या महोत्सवात स्पर्धेत सहभागी होतात. यंदा अमेरिकेतील Love (Nonfiction) – Episode One: Soulmates, चीनमधील Svteung Mvli: The Land of the Living आणि The People in the Time Tunnel यांच्यासह भारताचा माहितीपट अंतिम नामांकन यादीत झळकला आहे.
विशेष म्हणजे, काही गटांमध्ये थेट विजेते निवडण्यात आले असून ते नामांकन यादीत समाविष्ट नसतील. सर्व विजेत्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याने चित्रपटसृष्टीत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय विषय, संवेदनशील कथनशैली आणि जागतिक पातळीवर पोहोचणारी मांडणी यामुळे ‘My Sweet Paro’ या माहितीपटाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. कॅन्समधील या यशामुळे भारतीय स्वतंत्र चित्रपटांना आंतरराष्ट्रीय मंचावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जानेवारी २०२६ च्या विजेत्यांची घोषणा आता काही क्षणांचीच बाब असून, भारतीय चित्रपटाला सुवर्णक्षण लाभतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



