अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या सभेला महापौर ज्योतीताई गाडे अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त यशवंत डांगे व उपमहापौर अॅड. धनंजय जाधव उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकिटातून सदस्यांची नावे महापौरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर महापौर ज्योती गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांनी अधिकृत घोषणा केली.
🔹 स्थायी समिती सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट):
गौरी बोरकर, सुरेश बनसोडे, हरप्रीत कौर गंभीर, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे
भाजप:
सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे
शिंदे सेना:
नवनाथ कातोरे, सुनिता गेनप्पा
काँग्रेस:
खान मीनाज जाफर
एमआयएम:
शेख शहनाज खालिद
🔹 महिला-बालकल्याण समिती सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस:
दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेट्टीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, अश्विनी लोंढे
भाजप:
वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, वर्षा सानप
शिंदे सेना:
मंगल लोखंडे, रूपाली दातरंगे
काँग्रेस:
खान मीनाज जाफर
एमआयएम:
शेख शहनाज खालिद
🔹 स्वीकृत नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस:
विकी जगताप, रेवणनाथ पवार, बाबुशेठ नागरगोजे
भाजप:
विशाल नाकाडे, रवींद्र बारस्कर
शिंदे सेना:
आदेश सुरज जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती; मात्र कागदपत्रे अपुरी असल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. संबंधित कोटा शिंदेसेनेचाच असल्याने पुढील सभेत नव्या सदस्याची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडीमुळे मनपा समित्यांमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळाल्याचे चित्र दिसून आले. भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना यांच्यासह काँग्रेस आणि एमआयएमलाही संधी मिळाल्याने राजकीय समतोल साधला गेला आहे.



