अहिल्यानगर | प्रतिनिधी
येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या CSRD-ISWR समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यूचा विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील युवा धावपटू शुभम अरुण हंबीरराव यांची 200 मीटर अॅथलेटिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
Youth Games Council India (YGCI) यांच्या वतीने आयोजित 8th Youth Games Indo-Nepal International Series 2026 या स्पर्धेसाठी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आले आहे.
अलीकडेच गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शुभम यांची निवड निश्चित करण्यात आली. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २२ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान नेपाळमधील Pokhara येथे होणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनात वायजीसीआयसोबत आंतरराष्ट्रीय क्रीडा भागीदारांचा सहभाग असून, खेळाडूंना एसी/नॉन-एसी बस प्रवास (गोरखपूर–नेपाळ–परत), निवास, भोजन, आयडी कार्ड, इंडिया ब्लेझर, टीम ट्रॅकसूट, किट बॅग, सहभाग प्रमाणपत्र तसेच गुणवत्तेनुसार पदक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय शहर दर्शन, समारोप सोहळा, माध्यम कव्हरेज आणि टीम छायाचित्रांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंनी २२ मार्च २०२६ पूर्वी आपली सहभाग नोंद ईमेलद्वारे (infovgci@gmail.com) किंवा संबंधित प्रशिक्षक/जिल्हा समन्वयकांकडे करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश शुल्क सादर करणे बंधनकारक आहे.
शुभम हंबीरराव यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय संधीमुळे भारताचा झेंडा उंचावेल, असा विश्वास Dr. Suresh Pathare यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदिप जारे, डॉ. विजय संसारे, डॉ. आसावरी झपके, ट्विंकल ईश्वरी, डॉ. जैमोन वर्गीस, प्रा. सॅम्युअल वाघमारे तसेच टीम रयत समाचार यांनी शुभम हंबीरराव यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.



