युथ गेम्स कौन्सिल इंडियामार्फत आदित्य साठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; नेपाळमध्ये होणार प्रतिनिधित्व

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Youth Games Council India यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आदित्य अशोक साठे याची भारतीय संघात निवड झाली आहे. ही मानाची स्पर्धा शेजारील देश Nepal येथे आयोजित करण्यात आली आहे.

(Games) आदित्यने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

नेपाळमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत आदित्य भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *