आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचलित आनंद पार्श्व प्रि-स्कूल नवीपेठ शाळेची मुलं-मुली संस्कार शिक्षा व सेवा या त्रिवेणी संगमाने आपला सर्वांगीण विकास करत आहेत. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषिजी म.सा. व संस्कार प्रेमी प.पू आलोकऋषिजी म.सा. यांच्या आशीर्वादाने, तसेच अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष अजित माने व संचालक अभय गायकवाड तसेच डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी यांच्या सहकार्याने अनामप्रेम येथे लहान चिमुकल्यांची आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली.या कार्यासाठी आनंद नवकार परिवारच्या सर्व ट्रस्टीं चे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या शुभकार्याची सुरुवात गणेशवंदना व नवकार मंत्र जापाने करण्यात आली. या प्रसंगी आनंद पार्श्व प्रि स्कूलच्या प्राचार्य ज्योती पुरी व शाळेचे मेन कमिटी मेंबर मेघा बोरा यांनी शाळेच्या वाटचाली बद्दल मुलांसोबत संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या गौरी इंगळे व श्रद्धा काटे यांनी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पूज्य श्रीआनंदऋषीजी म. सा. यांच्या जीवनावर त्यांनी सुंदर भजन सादर केले.
सलग सात वर्षापासून हा सुंदर उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येत आहे, त्यामध्ये पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी लहान चिमुकल्यांची अनाम प्रेम मधील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेचा शिक्षक वर्ग – रेखा जेटला , नूतन पितळे श्रद्धा पारेख व तरुण ढवळे यांनी मुलांची योग्यरीत्या संभाळ करून या उपक्रमाला हातभार लावला.
स्वर्गीय रमेशचंद्रजी बाफना व त्यांचे परिवाराचे शाळेला नेहमी अनमोल मार्गदर्शन मिळत आहे.
अनामप्रेम संस्थेचे श्री चेतन लांडगे सर यांनी शाळेचे व पालकांचे आभार मानत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अशी माहिती आनंद पार्श्व प्रि प्रायमरी स्कूलच्या प्राचार्य ज्योती पुरी यांनी दिली.