अहिल्यानगरीत गुरुनानक जयघोष; श्रद्धा, एकता आणि भक्तीचा सोहळा

अहिल्यानगर | जैनवार्ता “बोले सो निहाल, सत श्री अकाल” या घोषणांनी अहिल्यानगरी दुमदुमली, जेव्हा शहरात गुरुनानक देवजींची ५५६ वी जयंती (गुरुपुरब) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक…

अशोका आर्ट गॅलरीतील सूक्ष्म खडूशिल्पे पाहून मावळे झाले थक्क

अहिल्यानगर | प्रतिनिधी सावेडी उपनगरातील अशोका आर्ट गॅलरीला नुकतीच शिवशाहीर आचार्य हेमंतराजे मावळे यांनी भेट देऊन खडूशिल्पकलेचे अवलोकन केले. या वेळी त्यांनी व्यक्त केले की, “खडूशिल्पात व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव इतक्या स्पष्टपणे दिसणे हेच एक आश्चर्य आहे. दीड सेंटीमीटरपेक्षा लहान असलेल्या या शिल्पांमध्ये कलाकाराने भावना जिवंत केल्या आहेत.” मावळे यांनी गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य, छत्रपती शिवाजी…

Diwali Celebration उत्कर्ष बालभवनला सेवाप्रीत फाउंडेशनकडून साऊंड सिस्टम भेट; ‘सामाजिक ऐक्याची दिवाळी’ साजरी

अहिल्यानगर | जैनवार्ता ( Diwali Celebration ) शिक्षण आणि सामाजिक जाणिवा दृढ करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला साऊंड सिस्टमची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्य देत महिलांनी मुलांसोबत “सामाजिक ऐक्याची दिवाळी” आनंदात साजरी केली. मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात…

संविधान मूल्यांचा संदेश संत साहित्याच्या माध्यमातून; ओबीसीतील ४४ जाती एकत्र आणणाऱ्या संघटनेचा उपक्रम

अमरावती | जैनवार्ता अमरावती जिल्ह्यात वैचारिक चळवळींचे समन्वयित कार्य सातत्याने व्यापक होत. त्याचाच भाग म्हणून कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावरील संविधान प्रवचन नुकतेच पार पडले. या प्रवचनाचे आयोजन डॉ. श्रीराम कोल्हे आणि वासुदेव चौधरी यांच्या अभिनव सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आले. अलुतेदार–बलुतेदार प्रवर्गातील तब्बल…

मल्हारगडाच्या प्रतिकृतीस रुद्र शिंदेला प्रथम पारितोषिक

श्रीगोंदा | प्रतिनिधी तालुक्यातील मढेवडगाव येथे मावळा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित “किल्ले बनवा” या स्पर्धेत जि.प. उंडेमळा शाळेचा विद्यार्थी रुद्र महेश शिंदे याने बनवलेल्या मल्हारगडाच्या प्रतिकृतीस इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक मिळाला. इयत्ता तिसरी गटात अस्मिता प्रदीप उंडे हिने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हर्षल मनोज सुपेकर (जंजिरा किल्ला) व लोकेश नवनाथ शिंदे (शिवनेरी किल्ला) यांनी…

जिल्हास्तर युवा महोत्सव ३ व ४ नोव्हेंबरला; सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील तरुणाईच्या सर्वांगीण विकासाला चालना देत सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि नवोन्मेष जपण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली….

“फटाक्यांऐवजी किल्ले बांधू या!” — संजीवनी संस्थेची अनोखी दिवाळी किल्ला स्पर्धा सुरू

मुंबई | जैनवार्ता दिवाळीचा सण उजळवताना इतिहासाशी नातं जोडण्याचा आगळावेगळा उपक्रम मुंबईत राबवला जात आहे. संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, मुंबई यांनी “किल्ला बांधणी स्पर्धा – २०२५” या उपक्रमाची घोषणा केली असून, “फेकला तर दगड, रचला तर किल्ला… चला तर मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडूया!” या घोषवाक्याने या स्पर्धेला ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा…

आनंद पार्श्व प्रि स्कूलच्या चिमुकल्यांची अनामप्रेम येथे आगळीवेगळी दिवाळी साजरी.

अहिल्यानगर | जैनवार्ता आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचलित आनंद पार्श्व प्रि-स्कूल नवीपेठ शाळेची मुलं-मुली संस्कार शिक्षा व सेवा या त्रिवेणी संगमाने आपला सर्वांगीण विकास करत आहेत. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषिजी म.सा. व संस्कार प्रेमी प.पू आलोकऋषिजी म.सा. यांच्या आशीर्वादाने, तसेच अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष अजित माने व संचालक अभय गायकवाड तसेच डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी यांच्या…

जैन सोशल फेडरेशनच्या महावीर भवनात दिवाळी फराळ महोत्सवाची धमाल सुरुवात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर स्वादिष्ट फराळ विक्री; १२ वर्षांची सामाजिक सेवेतली गोड परंपरा

अहिल्यानगर | जैनवार्ता जैन सोशल फेडरेशन संचलित भगवान महावीर भवनात सलग १२ व्या वर्षी दिवाळी फराळ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सर्वसामान्यांच्या दिवाळीला गोडवा आणि आनंदाचा स्पर्श मिळावा, या हेतूने सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन नागपूरचे नामवंत उद्योजक उमेश पगारिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोपटलाल सुराणा, बसंतीलाल गोलेचा (नागपूर), केसरीमल छाजेड, संतोष बोथरा, सतीश…

जैन 32 आगम शोभायात्रा उत्साहात; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघच्या वतीने उत्साहात आणि भक्तीभावाने 32 आगमची शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी भगवान महावीर स्वामींच्या आगमसूत्रांचे धार्मिक पूजन करण्यात आले, त्यानंतर आगम दिंडी भक्तिभाव आणि जल्लोषात निघाली. संपूर्ण परिसर “जय महावीर, जय आनंद” या घोषणांनी दुमदुमला. चातुर्मासाच्या पवित्र निमित्ताने हा धार्मिक सोहळा महासती प.पू. दिव्यदर्शना…