गांधी, शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच…

आमी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत; अवघ्या दोन तासांत 600 मदत कीटची उभारणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत तर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी नगर एम.आय.डी.सी. येथील आमी संघटनेचे उद्योजक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आमी संघटनेने किराणा किट्सची मदत रवाना…

शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला घर घर लंगर सेवा; सिना नदीलगतच्या वसाहतींमध्ये नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकीट वितरण

अहिल्यानगर | प्रतिनिधी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला आलेल्या पूराने नदीलगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. घरात संपूर्ण पाणी घुसल्याने नागरिकांची दैनंदिन घडी विस्कटली होती. स्वयंपाक करण्याची कोणतीही सोय नसल्याने नागरिक उपाशी राहण्याची वेळ आली. या गंभीर परिस्थितीत गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा नागरिकांच्या मदतीला धावून आली. लंगर सेवेच्या सेवादारांनी संध्याकाळी…

सीएसआरडीचा पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी “कृषक संजीवनी” उपक्रम

मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित – साहित्य संकलनाचे आवाहन   अहिल्यानगर | प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची छप्परे उडाली, धान्यसाठे वाहून गेले, जनावरांची जीवितहानी झाली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व दैनंदिन जगण्याच्या वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या. या संकटात अन्नदाता शेतकरी बांधव अक्षरशः हतबल झाले…

छायाताई फिरोदिया यांना जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा जीवन गौरव पुरस्कार

अहिल्यानगर प्रतिनिधी समाजकार्यातील उल्लेखनीय कार्य, अखंड जनसेवा आणि संघटनात्मक नेतृत्वाची भक्कम पायाभरणी यांची दखल घेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.   या गौरवामुळे फिरोदिया यांच्या कार्याचा व्यापक सन्मान झाला असून, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची ठळक नोंद…