मानवतेचा उत्सव! सीएसआरडी संस्थेचा पुरग्रस्तांना दिलासा देणारा उपक्रम

अहिल्यानगर | जैनवार्ता शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये ग्रामीण विकास व अध्ययन केंद्र (CSRD) समाजकार्य व संशोधन संस्थेने मानवतेचा आदर्श उभा केला आहे. संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत संकटग्रस्तांना दिलासा दिला. या सामाजिक उपक्रमांतर्गत सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात मदतफेरी काढली…

विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे – दादासाहेब गीते; आयएमएस विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांसाठी उपक्रम

अहिल्यानगर | जैनवार्ता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना “विद्यार्थ्यांनी सामाजिक भावना जपण्यास पुढे आले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले. अहिल्यानगर येथील आयएमएस व्यवस्थापन संस्था वतीने करंजी गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ॲड. गोरख पालवे, करंजी गावचे…

अहमदनगर महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहिल्यानगर | जैनवार्ता अहमदनगर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या शालेय बॅग, स्टील वॉटर बॉटल, एक्झाम पॅड, फोल्डर, रजिस्टर, पेन-पेन्सिल, खोडरबर यांसह आवश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,…

पत्रकारांसाठी कॅशलेस आरोग्य सेवेचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन

मुंबई | जैनवार्ता राज्यातील पत्रकारांसाठी कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासनाच्या आरोग्य योजना, तसेच मध्यप्रदेश सरकारच्या कॅशलेस आरोग्य योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सर्वसमावेशक…

“वाचन हीच खरी क्रांती” — प्रा. डॉ. चौरे यांचा विद्यार्थ्यांना संदेश

अहिल्यानगर | जैनवार्ता बाबुजी आव्हाड महाविद्यालयात भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. चौरे म्हणाले, “आज मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणारी बोटे पुस्तकांच्या पानांवर फिरायला हवीत. प्रत्येक विद्यार्थ्याने व्यक्तिमत्व विकास,…

अहिल्यानगर जिल्हाव्यापी महिला परिषद रविवारी — पन्नास वर्षांच्या स्त्री चळवळीचा सखोल आढावा; १२ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी सभागृहात महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वतीने आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथे येत्या रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाव्यापी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद, अहिल्यानगर आणि ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद सीएसआरडी सभागृहात सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी…

सामाजिक जबाबदारीची भावना — खरी शिक्षणाची दिशा : स्वाती चेमटे लिटल वंडर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘मिशन माणुसकी’तून पूरग्रस्तांना मदतीचा हात

नगर तालुका | जैनवार्ता जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विश्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली जाणीव आणि सहकार्यभाव दाखवत पूरग्रस्त बांधवांसाठी ‘मिशन माणुसकी’ ही मदत मोहिम राबवली. अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक भागात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीबाबत समजताच विद्यार्थ्यांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे करत सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण घालून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातील पैसे, खाऊ तसेच…

मोफत उद्योजकता प्रशिक्षण; युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी

अहमदनगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक व विशेष घटक योजनेअंतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात डाटा एन्ट्री…

जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; रुग्णांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय

अहमदनगर | प्रतिनिधी जागतिक अंध दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष…

भाकप, किसान सभेचे राज्यभर रास्ता रोको आंदोलन; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार मदतीची मागणी

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा सचिवांची बैठक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी होते. मागील दोन महिन्यांपासून विशेषतः…