श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

अहिल्यानगर | (पाथर्डी) प्रतिनिधी कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, संघभावना आणि सृजनशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती सदस्य मा. श्री मुरली तात्या भगत होते. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलासराव भगत यांच्या…

पत्रकारितेचा अनुभव पुस्तकरूपात मांडण्याची गरज – सुधीर लंके ; मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर | प्रतिनिधी पत्रकारांनी केवळ दैनंदिन बातम्यांपुरते मर्यादित न राहता आपल्या पत्रकारितेचा प्रवास, अनुभव व बदलत्या काळातील निरीक्षणे पुस्तकरूपात समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाचे लेखन नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल, तसेच पत्रकारितेचा ऐतिहासिक दस्तऐवज बनेल, असे प्रतिपादन शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले. मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने शहरात…

पर्यावरण संवर्धनातून नववर्षाचे स्वागत; इसळक गावात वृक्षारोपण उपक्रम

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानवाढीचे दुष्परिणाम सध्या सर्वत्र जाणवत असून, लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे मत हभप संदीप महाराज कळसे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील इसळक येथील गोसावीबाबा मंदिर परिसरात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कैलास लांडे, पोपट…

नवभारत विद्यालय देहरे 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला

अहिल्यानगर | जैनवार्ता नवभारत विद्यालय देहरे येथील 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. तब्बल 31 वर्षांनी सर्व मित्रमंडळी एकत्र येत असल्याने आनंद आणि भावनांचा अनोखा संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला. हा मेळावा अहिल्यानगर येथील हॉटेल मेघनंद येथे पार पडला. राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेले…

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेची सुरूवात; लहान मुलांच्या मोबाईल व्यसनाविरुद्ध मोठे पाऊल

पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती आवश्यक – सीईओ आनंद भंडारी अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्‌घाटन उत्साहात पार पडले. समाजात मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य…

श्रृती मनवेलीकर यांचा अनोखा सामाजिक वसा; सावली संस्थेतील अनाथ मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगावमधील सावली संस्थेत राहणाऱ्या एका अनाथ मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या श्रृती विक्रांत मनवेलीकर यांनी स्वीकारली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवत त्यांनी या मुलीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केला. पालकत्व स्वीकारतानाचा क्षण या निराधार मुलीसाठी आत्मविश्वास व आनंदाचा ठरला….

कासार पिंपळगावात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी; बालदिनानिमित्त विविध उपक्रम

अहिल्यानगर | पाथर्डी जैनवार्ता अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कासार पिंपळगाव येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती उत्सव आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड श्री. विजय भताने सरांनी केली. यावेळी श्री. लवांडे शिवाजी यांनी आपल्या मनोगतामधून नेहरूंच्या जीवनावर प्रकाश टाकत “मुले-मुलीच उद्याचे…

आरएसएसकडून आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

अहिल्यानगर | जैनवार्ता आद्य क्रांतिकारक व क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अहिल्यानगरमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. संघाचे जिल्हा कार्यवाहक हिराकांत रामदासी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीस व कार्यास आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी लहुजी वस्ताद साळवे यांनी…

पिंपळगाव माळवी येथे ३ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन; अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध ३ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामांचा शुभारंभ युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. या विकास प्रकल्पांत पिंपळगाव ते लक्ष्मीनगर डांबरीकरण रस्ता, सटुबाई रोड, भोसले…

सकल मराठा परिवारकडून भव्य रक्तदान शिबिर — “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” संदेशाने उजळला समाजभाव

शेवगाव | जैनवार्ता सामाजिक बांधिलकी जोपासत सकल मराठा परिवार यांच्या वतीने ता. १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव, अहिल्यानगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, दिले जाणारे प्रत्येक थेंब रक्त सर्व समाजातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी उपयोगी पडणार…