महावीर कलादालनात पुस्तकांचे मोठे प्रदर्शन; आकर्षक सवलतींमुळे वाचकांसाठी मेजवानी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

पुणे-स्थित ‘साहित्यानगरी’च्या वतीने मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे भव्य ग्रंथप्रदर्शन महावीर कलादालन, माळीवाडा बसस्थानकाजवळ, अहिल्यानगर येथे सुरू झाले आहे. पुस्तके १० ते ५० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलतीत उपलब्ध असल्याने वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संचालक नवनाथ भाबड व शिवाजी भाबड यांनी दिली.

भाबड म्हणाले की, या प्रदर्शनात कथा, कादंबरी, धार्मिक, ऐतिहासिक, बालवाङ्मय, पाककला, आरोग्यविषयक पुस्तके, संदर्भग्रंथ, तसेच शालेय आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा समावेश आहे. प्रसिद्ध लेखकांची लोकप्रिय तसेच स्थानिक लेखकांची पुस्तकेही खास किमतीत विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

‘छावा’, ‘श्रीमान योगी’, ‘ययाती’, ‘अपरिपूर्ण’, ‘युगंधर’, ‘एक होता कार्वर’, ‘बुद्धभूषण’, ‘मृत्यूंजय’, ‘शिवचरित्र’, ‘अ‍ॅटोमिक हॅबिट्स’, ‘आमचा बाप अन् आम्ही’, ‘रिच डॅड पूअर डॅड’, ‘रावण’, ‘द अल्केमिस्ट’, ‘इंटरेस्टेड ट्रेडिंग’ यांसारखी नामांकित पुस्तके विशेष सवलतीत उपलब्ध होत आहेत.

प्रदर्शनस्थळी विविध प्रकाशनांची नवी, चर्चित आणि क्लासिक पुस्तके मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आली असून वाचकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

अधिक माहितीसाठी ‘साहित्यानगरी’चे संचालक शिवाजी भाबड (९०९६७३२६५०) आणि नवनाथ भाबड (९८२२७८५८०१) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *