तालुक्यातील मढेवडगाव येथे मावळा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित “किल्ले बनवा” या स्पर्धेत जि.प. उंडेमळा शाळेचा विद्यार्थी रुद्र महेश शिंदे याने बनवलेल्या मल्हारगडाच्या प्रतिकृतीस इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक मिळाला.
इयत्ता तिसरी गटात अस्मिता प्रदीप उंडे हिने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हर्षल मनोज सुपेकर (जंजिरा किल्ला) व लोकेश नवनाथ शिंदे (शिवनेरी किल्ला) यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. तृतीय क्रमांक जीवन दीपक पवार (तोरणागड) आणि मृणाली संदीप जगताप (जंजिरा किल्ला) यांना मिळाला. तसेच शंभूराजे मोहन गायकवाड व शिवम किशोर मांडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.
शिवजयंती निमित्त विजेत्या विद्यार्थ्यांना मावळा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोरखराजे उंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागृती केली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राजकुमार उंडे, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.