मानसी चव्हाणची ‘अविष्कार’ स्पर्धेसाठी निवड; लाईनमन सुरक्षेसाठी साकारला ‘पासवर्ड बेस्ड सर्किट ब्रेकर’ प्रकल्प

अहिल्यानगर | जैनवार्ता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धा २०२५ साठी उपकेंद्र अहिल्यानगर येथील एफ.वाय. बी.एस्सी. डेटा सायन्स विभागातील कु. मानसी चव्हाण हिची निवड झाली आहे.

ही स्पर्धा ११ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे विद्यापीठात पार पडणार आहे.

कु. मानसी चव्हाण हिने जिल्हा पातळीवर “Password Based Circuit Breaker” हा अभिनव प्रकल्प सादर करून लक्षवेधी यश मिळवले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वीज पुरवठा यंत्रणेत कार्यरत लाईनमनच्या जीवन सुरक्षेला तांत्रिक आधार देणे हा आहे. पासवर्ड प्रणालीद्वारे नियंत्रित सर्किट ब्रेकरमुळे अपघाती वीज प्रवाह टाळता येईल आणि सुरक्षा पातळी अधिक मजबूत होईल, असे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

या यशाबद्दल मानसीला व्यवस्थापन परिषद सदस्य मा. डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रा. संदीप पालवे, विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे, प्रा. डॉ. बाबासाहेब थोरवे, प्रा. प्रियांका मेटकर, डॉ. अर्चना रोहोकले, प्रा. गणेश आव्हाड, प्रा. दर्शना गांधी, प्रा. लाविना भैरी, प्रा. गायत्री करपे व प्रा. मेघना कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

मानसीच्या या यशामुळे उपकेंद्र अहिल्यानगर आणि डेटा सायन्स विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *