सावेडी येथील गुलमोहर रोड परिसरात असलेल्या प्रयत्न फाऊंडेशनच्या प्रयत्न नर्सिंग कॉलेजने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्वल कामगिरी साधली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या ए.एन.एम अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थीनी उत्तम गुणांसह यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या आहेत.
कु. दिक्षा सकपाळ हिने डिस्टिंक्शन श्रेणीसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर इतर सर्व विद्यार्थीनी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. नर्सिंग क्षेत्रात कुशल मानवी संसाधन घडविण्याचे कार्य प्रयत्न नर्सिंग कॉलेजने गेल्या पंधरा वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे. ए.एन.एम आणि जी.एन.एम हे सरकारमान्य अभ्यासक्रम विद्यार्थिनींना उपलब्ध करून देत कॉलेजने शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम म्हस्के, संचालिका डॉ. शितल म्हस्के, प्राचार्या सौ. दिक्षा घाटविसावे, उपप्राचार्या सौ. स्मिता तडके आणि प्रशासक सौ. मीना लाड यांनी विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून गौरव केला.
प्रयत्न नर्सिंग कॉलेजने दाखवलेली ही कामगिरी नर्सिंग शिक्षणक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.