महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया चालू असून, अर्ज भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे.
नियमानुसार विद्यार्थ्यांची शाळास्तरावरून नोंदणी व अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. अद्ययावत वेळापत्रकानुसार विविध शुल्कांनुसार अर्ज भरण्यासाठी खालील मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत:
नियमित शुल्कासह अर्ज: 27 ऑक्टोबर 2025 ते 08 डिसेंबर 2025
उशिरा शुल्कासह अर्ज: 09 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025
अतिनियमित शुल्कासह अर्ज: 16 डिसेंबर 2025 ते 23 डिसेंबर 2025
अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज: 24 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025
परिषदेने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर 2025 नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, तसेच ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया यानंतर उपलब्ध राहणार नाही.
विद्यार्थ्यांनी व शाळांनी वेळापत्रकाचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तातडीने पूर्ण करावेत, असे आवाहन परिषदेच्या सूचनेत करण्यात आले आहे.