पोलिस अधीक्षकांनी पारधी समाजाच्या पालावर साजरी केली दिवाळी. मुलांनी शिक्षण घेऊन महिला- पुरुषांनी रोजगार निर्माण करावा- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे.
अहिल्यानगर | जैनवार्ता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी आगळीवेगळी साजरी करत समाजाभिमुख दृष्टिकोनाचा आदर्श ठेवला. कामरगावा जवळील पारधी समाजाच्या पालावर सोमवारी भेट देत त्यांनी मिठाई व साडीचोळींचे वाटप केली. या उपक्रमामुळे पारधी वस्तीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तसेच…
