भारतीय विद्यार्थिनीचा रोबोट थेट युरोपच्या मैदानात; अहिल्यानगर येथील दिया छाजेड आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर | जैनवार्ता पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी दिया प्रीतम छाजेड हिने देशभरातील हजारो स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. दियाने स्वतःच्या कल्पकतेवर आधारित “मोबाईलवर नियंत्रित शेतीसाठी उपयुक्त रोबोट” सादर केला. हा रोबोट नांगरणी, पेरणी, फवारणी, तसेच तापमान आणि आर्द्रतेचे…