पत्रकारांसाठी कॅशलेस आरोग्य सेवेचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन
मुंबई | जैनवार्ता राज्यातील पत्रकारांसाठी कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासनाच्या आरोग्य योजना, तसेच मध्यप्रदेश सरकारच्या कॅशलेस आरोग्य योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सर्वसमावेशक…
