लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या लीगचे मुख्य उद्दिष्ट महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे, ॲथलेटिक्सला प्रोत्साहन देणे, ग्रामीण व जिल्हा पातळीवरील नैसर्गिक क्रीडा प्रतिभा शोधणे आणि स्थानिक क्रीडा संस्था सक्षम करणे हे आहे.
देशभरातील ३०० जिल्ह्यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार , ता. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी येथे होणार आहे.हि स्पर्धा १४ वर्षांखालील मुली, १६ वर्षांखालील मुली अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक संस्था आणि मुलींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव आणि डॉ. उत्तम अनाप यांनी केले.
ही स्पर्धा प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून, सहभागींसाठी कुठलाही प्रवेश शुल्क नाही. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन व खेल प्राधिकरणतर्फे प्रमाणपत्र व पदके देण्यात येतील.
विशेष म्हणजे, भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनतर्फे नियुक्त निवड चाचणी पथक स्पर्धा दरम्यान जिल्ह्यांमध्ये भेट देऊन भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकणाऱ्या प्रतिभावान मुलींची निवड करणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप हारदे, श्रीरामसेतू आवारी, राहुल काळे, जगन गवांदे व अजित पवार प्रयत्नशील आहेत.
स्पर्धेसाठी खेळाडू व संस्थांनी खालील लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे:
(https://forms.gle/Qi4yKSw52pSw4HQ66)
अधिक माहितीसाठी संपर्क: दिनेश भालेराव – 9923837888, संदीप हारदे – 9657603732, श्रीरामसेतू आवारी – 9322015046 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या विशेष क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.