नगर तालुका | प्रतिनिधी
पिंपळगाव माळवी येथील समृद्धी योगा व ट्रेकिंग ग्रुप हा युवक-युवतींचा सक्रिय गट असून दर रविवारी परिसरातील डोंगरदऱ्यांवर ट्रेकिंग तसेच नियमित योगा, प्राणायाम व सूर्यनमस्कार वर्गांचे आयोजन करत असतो. गेल्या वर्षभरात ग्रुपने विविध पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उप(Special)क्रम राबवून समाजकार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
(Special) यंदा महाशिवरात्रीनिमित्त रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी पारंपरिक ट्रेकिंगऐवजी आरोग्य जागृतीसाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. पिंपळगाव ते डोंगरगण अशी काढण्यात आलेल्या या आरोग्य दिंडीत ग्रुपचे सुमारे ३० सदस्य सहभागी झाले.
(Special) महिलांनी नऊवारी साड्या नेसून, डोक्यावर तुळशीचे रोप व हातात वीणा घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला. दिंडी डोंगरगण येथील घाट गणपती व रामेश्वर मंदिरात पोहोचली. तेथे सहभागी सदस्यांनी फुगड्या खेळत तसेच भजन-कीर्तनाद्वारे धार्मिक वातावरणात आनंद साजरा केला.
(Special) या उपक्रमासाठी ग्रुपचे प्रमुख सदस्य संतोष बनकर, शैलेंद्र काळे, रोहिदास पुंड, हरिराम शिंदे, संकेत शिंदे, मनीषा जांभळे व सुवर्णा कुमटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही आरोग्य दिंडी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली असून शारीरिक व्यायाम, निसर्गाशी नाते आणि धार्मिक उत्सव यांचा समतोल साधण्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. समृद्धी योगा व ट्रेकिंग ग्रुपच्या या सर्जनशील उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर आरोग्य आणि सामाजिक जागृतीला सकारात्मक चालना मिळत आहे.



