आनंदधाम येथे संत द्वयांचे पुण्यस्मरण; गुणानुवाद, मासिक जाप व प्रवचन मालिकेची सुरुवात

अहिल्यानगर | जैनवार्ता

अहिल्यानगर येथील आनंदधाम येथे १९ व्या शतकातील जैन धर्मीयांचे द्वितीय पट्टधर आचार्य राष्ट्रसंत श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दोन महान साधू महात्म्यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आत्मार्थी श्री मोहनऋषिजी म.सा. आणि तपस्वी रत्न श्री मगनमुनिजी म.सा. या गुरुद्वयांनी आपले संयमी जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जिनशासनाच्या प्रचारासाठी समर्पित केले होते. श्री मोहनऋषिजी म.सा. हे सतत आत्मसाधनेत लीन असत, तर श्री मगनमुनिजी म.सा. यांनी कठोर तपश्चर्येद्वारे संयमाची विशेष साधना केली होती. अनेक मुमुक्षूंना दीक्षेसाठी प्रेरित करणाऱ्या या संत द्वयांच्या स्मृतीला उद्या भावांजली अर्पण करण्यात येणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी श्रावक-श्राविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

गुणानुवाद सभा :

शनिवार, ता. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गुणानुवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जाप, स्तवन आणि गुणानुवादाद्वारे संतांना अभिवादन केले जाईल.

मासिक जाप :

आचार्य भगवंतांचा पुण्यस्मरण दिवस म्हणून दर महिन्याच्या २८ तारखेला होणारा विशेष जाप आज दुपारी ३.०० वाजता होणार आहे.

प्रवचन श्रृंखला :

रविवार, ता. १ मार्चपासून दररोज सकाळी ९.०० वाजता विशेष प्रवचन मालिकेला प्रारंभ होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *