jainwarta

जैन 32 आगम शोभायात्रा उत्साहात; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघच्या वतीने उत्साहात आणि भक्तीभावाने 32 आगमची शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी भगवान महावीर स्वामींच्या आगमसूत्रांचे धार्मिक पूजन करण्यात आले, त्यानंतर आगम दिंडी भक्तिभाव आणि जल्लोषात निघाली. संपूर्ण परिसर “जय महावीर, जय आनंद” या घोषणांनी दुमदुमला. चातुर्मासाच्या पवित्र निमित्ताने हा धार्मिक सोहळा महासती प.पू. दिव्यदर्शना…

अहिल्यानगर जिल्हाव्यापी महिला परिषद रविवारी — पन्नास वर्षांच्या स्त्री चळवळीचा सखोल आढावा; १२ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी सभागृहात महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वतीने आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथे येत्या रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाव्यापी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद, अहिल्यानगर आणि ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद सीएसआरडी सभागृहात सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी…

साहित्य-संस्कृतीचा मेळा — सेनापती बापट साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी इंद्रजीत भालेराव ८ ते ९ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगरात आत्मनिर्धार फाउंडेशनतर्फे आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथे येत्या ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या समन्वयाने हे संमेलन आत्मनिर्धार फाउंडेशन (निंबळक, ता. अहिल्यानगर) तर्फे आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती संयोजक…

सामाजिक जबाबदारीची भावना — खरी शिक्षणाची दिशा : स्वाती चेमटे लिटल वंडर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘मिशन माणुसकी’तून पूरग्रस्तांना मदतीचा हात

नगर तालुका | जैनवार्ता जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विश्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली जाणीव आणि सहकार्यभाव दाखवत पूरग्रस्त बांधवांसाठी ‘मिशन माणुसकी’ ही मदत मोहिम राबवली. अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक भागात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीबाबत समजताच विद्यार्थ्यांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे करत सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण घालून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातील पैसे, खाऊ तसेच…

शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग — शेतकऱ्याचे दीड एकर ऊस जळून खाक!

जामखेड | जैनवार्ता जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात आज दुपारी ४ वाजता झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना गट नं. ६४४/१, मोहसीन सत्तार शेख यांच्या शेतात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेख यांच्या शेतातील उसाचा फड वीजवाहिनीच्या अगदी शेजारी होता. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उसावर पडल्याने आग लागली. काही…

Politics | सरकारच्या अल्पमदतीवर शेतकऱ्यांचा रोष; सामनगावात भाकपचा रास्तारोको”

शेवगाव | जैनवार्ता (Politics) अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामनगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”, “प्रतिहेक्टर सत्तर हजार मदत द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Politics) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार…

मोफत उद्योजकता प्रशिक्षण; युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी

अहमदनगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक व विशेष घटक योजनेअंतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात डाटा एन्ट्री…

जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; रुग्णांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय

अहमदनगर | प्रतिनिधी जागतिक अंध दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष…

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्याचा मान

अहिल्यानगर | (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन 2 बी च्या राज्यस्तरीय अधिवेशनात जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला सामाजिक कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्याचे प्रथम पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले. तसेच, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांना सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी ही…